बचत गटाची रक्कम लुटणा-या महिलांना अटक
By Admin | Updated: September 28, 2016 01:55 IST2016-09-28T01:55:25+5:302016-09-28T01:55:25+5:30
मोठी उमरीतील चोरी प्रकरणी दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली.

बचत गटाची रक्कम लुटणा-या महिलांना अटक
अकोला, दि. २७- मोठी उमरीतील संजय नगर येथील २ महिला आणि बाप लेकांनी मूर्तिजापूर तालुक्यातील शिवण येथील रहिवासी तसेच बचत गटाचे काम करणार्या एका युवकास मारहाण करून त्याच्याकडील रोख २८ हजार आणि मोबाइल अशा एकूण ३३ हजार रूपयांची लुटमार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करून किरण गणेश सोनोने आणि ज्योती श्रीकृष्ण शिंदे या दोन महिलांना अटक केली. शिवण येथील रहिवासी अमोल मनोहर मुलाम हे बचत गटाच्या कामानिमित्त आले असताना अक्षय दादाराव खंडारे, दादाराव खंडारे, किरण सोनोने आणि ज्योती शिंदे यांनी त्याला मारहाण करून लुटमार केल्याचा आरोप आहे.