शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: July 11, 2014 00:22 IST2014-07-11T00:22:52+5:302014-07-11T00:22:52+5:30

सातवीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

The molestation of the student by the teacher | शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अकोला: संगणक केंद्रामध्ये शिकण्यासाठी आलेल्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. विद्यार्थिनीच्या पालक व नातेवाइकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार इयत्ता सातवीमध्ये शिकणारी त्यांची मुलगी जठारपेठेतील प्रोनेट एज्युकेशनमध्ये संगणक प्रशिक्षण वर्गासाठी यायची. मंगळवारी दुपारी ती संगणक वर्गामध्ये गेली; परंतु ती काही वेळातच घरी परतली. मुलीने शिक्षक सय्यद सज्जाद हुसैन याने आपल्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केल्याची तिने सांगितले. ही बाब ऐकल्यावर संतप्त झालेल्या पालक व नातेवाइकांनी संगणक वर्गावर पोहोचून शिक्षकाला चांगलाच चोप दिला. आईच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी शिक्षकावर भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतल्याचे माहिती पडल्यावर त्याच्या सर्मथनार्थ एक गट समोर आला आणि पोलिसांना कारवाई करण्यामध्ये अडथळा आणण्याचे प्रयत्न या गटाने सुरू केले. दरम्यान, ही बाब दुसर्‍या गटाला माहिती पडताच त्यांनी मुलीच्या बाजूने रामदासपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी शिक्षकाचीही तक्रार नोंदवून घेतली.

Web Title: The molestation of the student by the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.