भाचीचा विनयभंग; मामा गजाआड
By Admin | Updated: November 15, 2014 00:25 IST2014-11-15T00:25:04+5:302014-11-15T00:25:04+5:30
मुर्तिजापूर तालुक्यातील घटना.

भाचीचा विनयभंग; मामा गजाआड
मूर्तिजापूर (अकोला): मामाने भाचीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे १३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. मामा-भाचीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणार्या नराधम मामाविरुद्ध मूर्तिजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी दीपक (२८) हा १३ नोव्हेंबरच्या रात्री सिरसो (गायरान) येथे राहत असलेल्या त्याच्या बहिणीच्या घरी गेला. त्यावेळी त्याची अल्पवयीन भाची घरात होती. त्याने भाचीला जेवण मागितले. तिने मामाला जेवण दिले. त्यावेळी दीपकने आपल्या भाचीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्याने शेजारचे लोक जमा झाले. पोलिसांनी फिर्यादीवरून आरोपी दीपक विरुद्ध भादंविच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मूर्तिजापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.