विवाहित महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: May 6, 2017 02:42 IST2017-05-06T02:42:12+5:302017-05-06T02:42:12+5:30
२४ तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर

विवाहित महिलेचा विनयभंग
अकोट: विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ५ मे रोजी तक्रार दाखल होताच न्यायालयात २४ तासाच्या आत दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली. पोपटखेड येथील फिर्यादी विवाहित महिला घरात झोपली असताना बाळू गोटू ठाकरे (३५) रा. पोपटखेड याने सदर महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलिसात करण्यात आली. ही घटना ४ मेच्या रात्री ११.४0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून ५ मे रोजी बाळू गोटू ठाकरे याच्याविरुद्ध भादंवि ४५२, ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.जे. अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काँ. हशमतखान पठाण यांनी २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.