तेल्हारा, दि. ६-तालुक्यातील खेलदेशपांडे येथे विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील २१ वर्षीय विवाहिता आपल्या अंगणात उभी असताना मंगेश गवारगुरू याने सदर विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध कलम ३५४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात हे.काँ. रवींद्र करणकर करीत आहेत.
विवाहितेचा विनयभंग, गुन्हा दाखल
By admin | Updated: January 7, 2017 02:39 IST