चार युवकांकडून विवाहितेचा विनयभंग
By Admin | Updated: August 28, 2015 01:15 IST2015-08-28T01:15:49+5:302015-08-28T01:15:49+5:30
जुने शहरातील घटना; गुन्हा दाखल.

चार युवकांकडून विवाहितेचा विनयभंग
अकोला: घरगुती वादातून चार युवकांनी घरात घुसून ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुरुवारी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुने शहरातील मारोतीनगरात राहणार्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, घरगुती वादातून गोपाल सुधाकर मुद्गल, विक्की यन्नेवार, राम बेढे आणि नरेंद्र नामक युवक बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तिच्या घरात घुसले. विवाहितेने त्यांना विरोध केला असता, त्यांनी अश्लील शिवीगाळ करून तिचा हात पकडला. विवाहितेच्या तक्रारीनुसार गुरुवारी पोलिसांनी युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला.