रौंदळा येथे ४० वर्षीय विवाहितेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 26, 2017 20:16 IST2017-05-26T20:16:04+5:302017-05-26T20:16:04+5:30
तेल्हारा: नजीकच्या रौंदळा येथे २५ मेच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एका ४० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गावातीलच एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रौंदळा येथे ४० वर्षीय विवाहितेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
रौंदळा येथील पीडित विवाहिता तिच्या जेठाच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान भाजी घेऊन जात असताना वीजपुरवठा खंडित होऊन सर्वत्र अंधार पडला. या संधीचा फायदा घेऊन आरोपी रामचंद्र ऊर्फ साधू खोटरे याने दुकानातून बाहेर येऊन तिचा विनयभंग केला. त्यामुळे पीडित विवाहितेने आरडाओरड केली असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेबाबत पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी २६ मे रोजी आरोपी रामचंद्र ऊर्फ साधू खोटरे याच्याविरुद्ध भादंविच्या ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रवींद्र करणकार हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.