महम्मद पैगंबरांचा फेसबुकवर अवमान
By Admin | Updated: January 11, 2015 01:17 IST2015-01-11T01:17:55+5:302015-01-11T01:17:55+5:30
अकोला सिटी कोतवाली ठाण्यात तक्रार.

महम्मद पैगंबरांचा फेसबुकवर अवमान
अकोला - फेसबुक या सोशल नेटवर्किंंग साईटवर महम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठक्कर नामक युवकाविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा तक्रार देण्यात आली. या प्रकरणी सायबर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
फेसबुकवर महम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला. हा प्रकार मो. शोएब हाजी सलीम हाजी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करणार्या युवकाचा शोध सुरू केला असून, यामधील ठक्कर नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंंत सुरू होती. या प्रकरणामुळे जुने शहरातील पोळा चौक परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.