मोदी सरकारच्या घोषणा पोकळ
By Admin | Updated: October 10, 2014 00:16 IST2014-10-10T00:16:10+5:302014-10-10T00:16:10+5:30
मेहकर येथील जाहीर सभेत मुकुल वासनिक यांचा आरोप.

मोदी सरकारच्या घोषणा पोकळ
मेहकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विविध विकासकामांचे नारे दिले होते. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी शेतकरी हिताचे काम न करता लोकांची दिशाभूल केली. या सरकारची सर्व आश्वासने पोकळ असतानाही ते घोषणांचा पाऊस पाडत आहेत, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस महासचिव मुकूल वासनिक यांनी केला.
मेहकर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव घुमरे यांच्या प्रचार सभेत वासनिक बोलत होते. अध्यक्षस्थानी श्याम उमाळकर होते.
राष्ट्रवादीच्या अजित पवारांना बोलण्याचे भान राहत नसल्याची टीका मुकुल वासनिक यांनी यावेळी केली. भाजपा, राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेवरही वासनिक यांनी विविध आरोप केले तसेच मेहकर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मणराव घुमरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन लोकांना केले.