भाजी बाजारातून मोबाईल लंपास
By Admin | Updated: May 7, 2014 19:29 IST2014-05-06T22:07:23+5:302014-05-07T19:29:52+5:30
जनता भाजी बाजारात भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचा १८ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला

भाजी बाजारातून मोबाईल लंपास
अकोला: जनता भाजी बाजारात भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचा १८ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शेलार फैलात राहणारे अनिल नवले (४0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते जनता भाजी बाजारामध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आले. यादरम्यान त्यांच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. अनिल नवले यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.