‘मोबाइल अप्लिकेशन’द्वारे मिळणार ‘जलयुक्त’ कामांची माहिती
By Admin | Updated: May 21, 2015 01:44 IST2015-05-21T01:44:18+5:302015-05-21T01:44:18+5:30
कामांचे फोटो घेण्याचे काम सुरू

‘मोबाइल अप्लिकेशन’द्वारे मिळणार ‘जलयुक्त’ कामांची माहिती
अकोला: शासनामार्फत राबविण्यात येणार्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कामांची माहिती आता ह्यमोबाइल अप्लिकेशनह्णद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे फोटो काढण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून १८ मे पासून सुरू करण्यात आले आहे. शासनामार्फत ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेली कामे, पूर्ण झालेली कामे यासंदर्भात प्रशासनासह नागरिकांना कामांची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, तसेच ह्यजलयुक्त शिवारह्णच्या कामांमध्ये पारदर्शकता असावी, यासाठी ह्यमोबाइल अप्लिकेशनह्णचा वापर करण्यात येत आहे. जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय ५ डिसेंबर २0१४ मधील मुद्दा क्र.२२ अभियानाची फलनिष्पत्ती, यामध्ये ह्यजीपीएस मॉनिटरिंगह्णबाबत नूमद करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या कामांची भौगोलिक माहिती व फोटो प्रणालीद्वारे नोंद घेण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन (एमआरएसएसी) या संस्थेच्या माध्यमातून ह्यमोबाइल अप्लिकेशनह्ण विकसित करण्यात आले असून, या प्रणालीचा कार्यक्षेत्रावर प्रत्यक्ष वापर करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना २८ एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे देण्यात आले. मोबाइल अप्लिकेशनद्वारे घेण्यात आलेल्या कामाची माहिती ह्यजलयुक्तह्ण संकेतस्थळावर पाठविली जाणार आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचे फोटो घेण्याचे काम संबंधित यंत्रणाकडून १८ मे पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाइल अप्लिकेशनद्वारे शासनाच्या जलयुक्त संकेतस्थळावर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांची भौगोलिक स्थिती व फोटोसह माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.