शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ विक्रीविरोधात ‘मनसे’ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 17:15 IST

अकोला शहरातील राधाकृष्ण सिनेमा या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहावर रविवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली.

ठळक मुद्दे मुंबई, ठाण्यापाठोपाठ रविवार अकोल्यातही मनसेने मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केले.नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मल्टिप्लेक्स प्रशासनाला दिली.यावेळी चित्रपटगृह प्रशासनाने एक दिवसाची मुदत देण्याची विनंती केली.

अकोला : मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थांच्या चढ्या दराने होणारी विक्री आणि बाहेरील खाद्यपदार्थांना असलेल्या बंदीविरोधात न्यायालयाने फटकारल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने याविरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई, ठाण्यापाठोपाठ रविवार अकोल्यातही मनसेने मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केले.अकोला शहरातील राधाकृष्ण सिनेमा या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहावर रविवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली. मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली विक्रीदरांबाबत राज्य शासनाने नियमावली आखून दिली आहे. मात्र, मल्टिप्लेक्स चालकांकडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे सांगत या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मल्टिप्लेक्स प्रशासनाला दिली.सोमवारपर्यंत खाद्यपदार्थ तसेच शितपेय व खाद्यपदार्थ नियमित किंमतीमध्ये देणे सुरु नाही केले, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. उद्दभवणाºया परिस्थितीस चित्रपट गृह व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा मनसे पदाधिकाºयांनी दिला. यावेळी चित्रपटगृह प्रशासनाने एक दिवसाची मुदत देण्याची विनंती केली. यावेळी पंकज साबळे,सौरभ भगत,आदित्य दामले ,अरविंद शुक्ल, ललित यावलकर, सतीश फाले, विकास मोळके, दीपक खेतान,चंदू अग्रवाल,आकाश गवळी, राजेश पिंजरकर,भूषण भिरड,गोपाल मुदगल,संजय राजहंस,पंकज चव्हाण,शुभम गावंडे,बाळू ढोले,सारंग भरणे ई उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाMNSमनसेcinemaसिनेमा