शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रोहयो मजुरीचे ५५ कोटी बुडाले; अधिकारी-कर्मचाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 1:51 PM

घरकुल लाभार्थींचे जवळपास ५५ कोटी रुपये बुडाल्याचा प्रकारही घडला आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या राज्यातील विविध कामांवर अकुशल कामे करणाºया मजुरांना २०१५ ते २०१८ या काळात कामाचा मोबदला १४ दिवसांत अदा झाला नाही. त्यातच घरकुल लाभार्थींचे जवळपास ५५ कोटी रुपये बुडाल्याचा प्रकारही घडला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील ९ गटविकास अधिकाऱ्यांसह ५४ अधिकारी-कर्मचाºयांकडून ८ लाखांपेक्षाही अधिक रकमेची दंडात्मक वसुली करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ८ जानेवारी रोजी दिला. त्यामध्ये घरकुल लाभार्थींवर अन्याय करणाºयांचाही समावेश आहे.राज्यात रोजगार हमी योजनेची मजुरी आणि साहित्याच्या मोबदल्यापोटी देय असलेला २९७ कोटी ७७ लाखांपेक्षाही अधिक निधी मार्च २०१९ पर्यंतही प्राप्त झाला नव्हता. त्यामध्ये कामगारांची मजुरी, कुशल कामांच्या साहित्याच्या देयकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींना मजुरांची मजुरी ठरलेल्या वेळेत अदा करणे आवश्यक होते; मात्र त्याकडेच रोजगार हमी योजनेतील संबंधितांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचा प्रकार गत तीन वर्षांत घडला. त्याची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्याकडे देण्यात आली. त्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.दंड झालेले अधिकारी-कर्मचारीदंड झालेल्या नऊ गटविकास अधिकाºयांमध्ये अकोला पंचायत समितीचे देवीदास बचुटे, एस. एम. पंडे, जी. के. वेले, डी. जी. पाटील, बार्शीटाकळीचे अशोक तायडे, ओ. टी. गाठेकर, मूर्तिजापूरचे जी. पी. अगर्ते, पातूरचे एम. बी. मुरकुटे, तेल्हाºयाचे गुरुनाथ पारसे यांचा समावेश आहे. सहायक लेखाधिकाºयांमध्ये गणेश कहार, जगदीश बेंद्रे, श्याम इंगळे, डी. जी. वक्ते, विनोद जगताप, एस. आर. डाखोरे, डी. टी. दखणे, डिगांबर जाधव, कृषी अधिकारी जी. आर. बोंडे, विस्तार अधिकारी गजानन गावंडे, शाखा अभियंता एस. व्ही. सिरसाट, ललिता सदापुरे, मंगेश काळे, कार्यक्रम अधिकारी उमेश सूर्यवंशी व अक्षय झाडोकार यांचा समावेश आहे.रोहयोच्या तांत्रिक सहायकांनाही फटकामजुरीला विलंब केल्याप्रकरणी सर्व संबंधितांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये रोजयो कक्षातील तांत्रिक सहायक कृषी, सिव्हिल, डाटा एन्ट्री आॅपरेटर, रोजगार सेवकांचाही समावेश आहे.४दंडात्मक कारवाई झालेल्या तांत्रिक सहायकांमध्ये अकोला पंचायत समितीचे दिनेश बागडे, कल्पना सत्रे, रितेश नंदाने, राजेश गुल्हाणे, शुभांगी काळणे, अश्विन पाटील, गोपाल गावंडे, मोहन महल्ले, मनीष अंबुस्कर, पवन पाटील, महेश भांडे, अकोटचे एस. डी. भोरे, एस. जी. आगे, बार्शीटाकळीचे विठ्ठल अंबुलकर, महेश देवगिरीकर, प्रज्वल उमाळे, मूर्तिजापूरचे शिरीष सदापुरे, अविनाश मेश्राम, वाघकर, गणेश इंगळे, पातूरचे जितेंद्र प्रजापती, योगेश महल्ले, योगेश चाकोतकर, मांगुळकर व इंगोले यांचा समावेश आहे. सोबतच पाच डाटा एन्ट्री आॅपरेटर, पाच ग्रामरोजगार सेवकांनाही दंड भरावा लागणार आहे.

दंडाची तरतूद बसविली होती धाब्यावरदुष्काळी भागात मजुरांच्या हाताला काम देणे, काम देण्यास शासन असमर्थ ठरल्यास मजुरांना बेकारी भत्ता देण्याची तरतूद कायद्यात आहे. मस्टर सादर झाल्याच्या १४ दिवसांत मजुरी अदा न केल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून दंड वसूल करण्याचीही तरतूद आहे. त्यानुसार मजुरांना वेळेवर मजुरी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ही बाब ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरली. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दंडाचा दणका दिला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला