बोर्डी गावाला आमदार अमोल मिटकरी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST2021-03-23T04:20:19+5:302021-03-23T04:20:19+5:30
आ. मिटकरी यांचा श्री क्षेत्र कासोद येथील वीरभद्र संस्थान येथे नियोजित दौरा होता. त्या दौऱ्यादरम्यान बोर्डी ग्रामपंचायतमध्ये भेट दिली. ...

बोर्डी गावाला आमदार अमोल मिटकरी यांची भेट
आ. मिटकरी यांचा श्री क्षेत्र कासोद येथील वीरभद्र संस्थान येथे नियोजित दौरा होता. त्या दौऱ्यादरम्यान बोर्डी ग्रामपंचायतमध्ये भेट दिली.
यावेळी ग्रामस्थांनी त्यांना गावातील समस्या सांगितल्या. त्यावेळी त्यांना लिखित स्वरूपात निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ पुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. ती सुरळीत करण्यासाठी आपल्या स्तरावरून पेयजल योजनेचा निधी मिळावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सुभाष लटकुटे, देवीदास बुले, राजेश भालतिलक, प्रकाश आतकड, मनोहर गये, रमेश उगाले, महोम्मद साजिद, रमेश राऊत, अरुण भागत, समाधान चंदन, नंदलाल ताडे, संजय ताडे, नंदलाल राॅय, सुभाष खिरकर, सुभाष तळोकार, राजेश खिरकर, प्रमोद काळने, विष्णू पखाले, अनिल ताडे, पुरुषोत्तम चेडे, बाळू देशमुख, सुनील लाहोरे, राजू वाघमारे, आदी उपस्थित होते.