घरकूल वाटप घोळाची चौकशी करण्याचे मिटकरी यांचे निर्देश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:57+5:302021-06-04T04:15:57+5:30
महाडीबीटी बियाणे, अनुदानित बियाणे अकोटला कुठेच मिळत नाही. याविषयी आढावा घेतला. कोरोनामुक्त गाव स्पर्धा आपण कशा प्रकारे राबविणार आहोत ...

घरकूल वाटप घोळाची चौकशी करण्याचे मिटकरी यांचे निर्देश!
महाडीबीटी बियाणे, अनुदानित बियाणे अकोटला कुठेच मिळत नाही. याविषयी आढावा घेतला. कोरोनामुक्त गाव स्पर्धा आपण कशा प्रकारे राबविणार आहोत याविषयी माहिती घेतली. बँकेत लोकांना नाहक त्रास देऊ नका. गावोगावी आरोग्य उपकेंद्रावरील कर्मचारी हजर असावा अन्यथा कारवाई करा. प्रत्येक बँकेच्या एटीएममध्ये पैसे असायला हवे, बँकेत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या. ज्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड, कृषी अधिकारी शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर, गटविकास अधिकारी शिंदे उपस्थित होते.
फोटो:
गरीब कुटुंबे वंचित, श्रीमंत लाभार्थी यादीत!
लोकमतने घरकूल वाटपाचा घोळ उघड केल्याच्या वृत्ताचा उल्लेख करीत आमदार अमोल मिटकरी यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शिवाय घरकुलापासून वंचित राहिलेल्या त्या विधवा लाभार्थी महिलेसह पात्र लाभार्थींच्या तांत्रिक त्रुटी दूर करून घरकुलाचा लाभ द्या, असे निर्देशही आमदार अमोल मिटकरी यांनी दिले.