शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली कारवाईची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 2:18 PM

गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने, यासंदर्भात कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली.

अकोला : गौण खनिजाच्या स्वामित्वधन रकमेचा (रॉयल्टी) पूर्ण भरणा करून, वाहतूक पासेस मिळविणाºया एका खदानधारकाने वाहतूक पासेसवर गौण खनिजाची विक्री न करता गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने, यासंदर्भात कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली.अकोट तालुक्यातील गाजीपूर येथील गट क्र .मधील १.२० हेक्टर आर भाडेपट्ट्याच्या क्षेत्रात खदान भाडेपट्टाधारक महेंद्र जयदीशप्रसाद तरडेजा यांनी गत २० नाव्हेंबर २०१० पासून गौण खनिजाचे उत्खनन सुरू केले. जिल्हाधिकाºयांच्या निर्देशाप्रमाणे वरिष्ठ उपसंचालक प्रादेशिक कार्यालय भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय नागपूर यांच्यामार्फत गत ५ सप्टेंबर २०१७ रोजी खदानधारक, गाजीपूरचे तलाठी, मंडळ अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांच्या उपस्थितीत ‘ईटीएस’ मशीनद्वारे गौण खनिज उत्खननाची मोजणी करण्यात आली. या मोजणी अहवालाप्रमाणे खदानधारकाने ६९ हजार ९९७ ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्वधन रकमेचा (रॉयल्टी) पूर्ण भरणा केला असून, प्रत्यक्षात गौण खनिजाचे उत्खनन ४६ हजार ७९० ब्रास करण्यात आले आहे. त्यामुळे खदानधारकाने उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधनाचा पूर्ण भरणा केला आहे; परंतु २३ हजार २०२ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन न करता, केवळ स्वामित्वधन रकमेचा (रॉयल्टी) भरणा करून, वाहतूक पासेस मिळविल्या आणि या वाहतूक पासेसवर गौण खनिजाची विक्री न करता गौण खनिज वाहतूक पासेसचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे यासंदर्भात संबंधित खदानधारकाचा खुलासा घेऊन कारवाई करण्याची शिफारस अकोट तहसीलदारांनी ३ आॅक्टोबर रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडे केली. 

अकोट तहसीलदारांनी केलेल्या शिफारस पत्रानुसार, संबंधित खदानधारकास नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोला