मुलासह महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 02:29 IST2017-06-18T02:02:17+5:302017-06-18T02:29:43+5:30

अकोट बसस्थानकावरील घटना

Missing woman with boy | मुलासह महिला बेपत्ता

मुलासह महिला बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट येथील बसस्थानकावरून आपल्या तीन वर्षांंच्या चिमुकल्यासह आष्टी येथे जाण्याकरिता निघालेली महिला चिमुकल्यासह बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोधाशोध केली असता आढळून न आल्याने १७ जून रोजी अकोट शहर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळेगाव येथील बेपत्ता महिलेचा भाऊ विवेक दिलीप कुंजाम याने शहर पोलिसांत फिर्याद दिली, की मनीषा विनोद टेकाम (२२) व भाचा सार्थक विनोद टेकाम (३) रा. आष्टी जि. वर्धा यांना १५ जून रोजी दुपारी १२.३0 वाजता अकोट बसस्थानकावरून जळगाव ते नागपूरकडे जाणार्‍या बसमध्ये त्यांच्या घरी जाण्याकरिता बसवून दिले; परंतु ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यांचा शोध घेतला असता मिळून आले नाहीत. त्यामुळे १७ जून रोजी अकोट शहर पोलीस स्टेशनला प्राप्त तक्रारीवरून बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. सदर तक्रारीवरून पोलीस तपास करीत आहे. याविषयी माहिती असल्यास कळवावे, असे शहर पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांनी सांगितले.

Web Title: Missing woman with boy