गौण खनिज तस्करी, २0 हजाराची दंड वसुली
By Admin | Updated: September 28, 2014 00:09 IST2014-09-27T23:59:43+5:302014-09-28T00:09:32+5:30
वाशिम तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची तस्करी.

गौण खनिज तस्करी, २0 हजाराची दंड वसुली
वाशिम : तालुक्यातील राजगाव येथे स्टॅटिक सर्व्हायलंस पथकाच्या माध्यमातून अवैधरित्या गौण खनिजाची उचल करणार्या वाहनांवर महसुल विभागाने कारवाई करुन २0 हजार ४00 रुपयाच्या दंडाची वसुली केली.
२७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या कारवाईत महसुलच्या पथकाचे प्रमुख मंडळ अधिकारी श्याम जोशी, तलाठी यु.पी. राठोड, आर.एम. जोशी, एस.एम. साबळे यांच्यासह इतर सहभागी झाले होते. यासंदर्भात अधिक माहितीनुसार राजगावपासून काही अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची तस्करी केल्या जात असल्याची माहिती महसुल विभागाच्या राजगाव पॉईंटवरील पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे राजगाव पॉईंटवरील पथकाने सायंकाळी ४ च्या सुमारास पैनगंगा नदीच्या पात्रात प्रत्यक्ष जावून अवैधरित्या रेतीची तस्करी करीत असलेल्या कनेरगाव येथील दोन ट्रॅ क्टरांना रंगेहाथ पकडले. यामध्ये दोन्ही ट्रॅक्टर मालकांवर अवैधरित्या रेतीची तस्करी केल्याप्रकरणी महसुल विभागाच्या वतीने प्रत्येकी १0 हजार २00 रुपये मिळून २0 हजार ४00 रुपयाच्या दंडाची वसुली करण्यात आली.