किरकोळ वादातून नागरिकांच्या घरांवर दगडफेक
By Admin | Updated: September 11, 2014 01:23 IST2014-09-11T01:23:39+5:302014-09-11T01:23:39+5:30
दगडफेकीत ७ जण जखमी, खदानच्या शास्त्रीनगरातील घटना.

किरकोळ वादातून नागरिकांच्या घरांवर दगडफेक
अकोला : किरकोळ वादातून एका गटातील युवकांनी नागरिकांच्या घरांवर दगडफेक केल्याची घटना बुधवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास खदान भागातील शास्त्रीनगरात घडली. दगडफेकीमध्ये ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगरातील काही युवक गणपती विसर्जनासाठी जात असता, त्यांना एका गटाने त्यांच्या गल्लीतून गणपती नेण्यास विरोध केल्याने युवकांनी त्या गल्लीतून गणपती नेला नाही. त्यामुळे वातावरण निवळले होते; परंतु बुधवारी सायंकाळी हातपंपावर पाणी भरण्याच्या कारणावरून काही महिलांमध्ये वाद झाल्याचे निमित्त पुढे करून खदान भागातील ५0 ते ६0 युवकांनी वाद उकरून काढला आणि शास्त्रीनगर भागातील गोपाल सोनोने, योगेश राऊत, अरुण बान्ते, रवी काची यांच्यासह इतर घरांवर दगडफेक केली व काचेच्या बाटल्यासुद्धा फेकल्या. या दगडफेकीत ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू केला