मिनीडोरच्या धडकेने महिला ठार, गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 22, 2016 01:28 IST2016-01-22T01:28:32+5:302016-01-22T01:28:32+5:30

अपघातात सदर महिला ठार तर चालक जखमी.

Minor killed women, filed a complaint | मिनीडोरच्या धडकेने महिला ठार, गुन्हा दाखल

मिनीडोरच्या धडकेने महिला ठार, गुन्हा दाखल

पिंजर (जि. अकोला) : नजीकच्या खेर्डा खुर्द फाटा ते खेर्डा रस्त्यावर मिनीडोरच्या धडकेने एक महिला ठार झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली. खेर्डा खुर्द येथील सुनील रमेश पाटेकर (३२) यांनी त्यांची एम.एच. ३0 ए.एफ.७६४२ क्रमांकाची मिनीडोर गाडी खेर्डा खुर्द फाटा ते खेर्डा रस्त्यावर गुरुवारी भरधाव चालविली. यावेळी दळण घेऊन रस्त्याने जाणार्‍या कमलाबाई रामजी जाधव (७0) या वृद्धेला जबर धडक दिली. या अपघातात सदर महिला ठार झाली तर मिनीडोरचा चालक सुनील पाटेकर हासुद्धा जखमी झाला. या घटनेबाबत खेर्डा खुर्दचे पोलीस पाटील गणेश नारायणराव इंगोले यांनी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून पिंजर पोलिसांनी वाहनचालक पाटेकर विरुद्ध भा.दं.वि.चे २७९, ३३७ कलम व मोटारवाहन कायद्यांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Minor killed women, filed a complaint