अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
By Admin | Updated: July 19, 2014 01:31 IST2014-07-19T01:31:34+5:302014-07-19T01:31:46+5:30
बाभूळगाव येथील १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
अकोला : बाभूळगाव परिसरात राहणार्या १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता सिव्हिल लाईन पोलिसांनी बाभूळगावातील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार, बाभूळगावात राहणारा सचिन मधुकर वाघ नामक युवकाने त्यांच्या १६ वर्षीय मुलीस लग्नाचे आमिष दाखवून २६ जून रोजी पळवून नेले. मुलीचा नातेवाईकांकडे शोध घेतला; परंतु ती मिळून आली नाही. काही लोकांनी सचिन वाघ या युवकासोबत ही मुलगी पळून गेल्याचे सांगितले. पित्याच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.