अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:12 IST2017-08-26T23:12:54+5:302017-08-26T23:12:54+5:30

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ : पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या लोहारा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी तिघांविरुद्ध २६ आॅगस्ट रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोहारा येथील १६ वर्षीय मुलगी रस्त्याने जात असताना मिलिंद बाबूराव मोरे याने पाठलाग करून ितचा विनयभंग केला. तसेच राहुल मोरे व अनिल मोरे यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांना मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आर.के. साठवणे करीत आहेत.