अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले!

By Admin | Updated: January 7, 2016 02:29 IST2016-01-07T02:29:53+5:302016-01-07T02:29:53+5:30

मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल ; अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.

Minor girl jammed! | अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले!

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले!

अकोला - रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतन महादेव गड्डम या युवकाने याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले. या युवकाने सदर मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविले असून, तिच्या वडिलांनी या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी चेतन गड्डम व त्याच्या आईविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ आणि ३६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor girl jammed!