अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 22:59 IST2017-07-24T22:59:07+5:302017-07-24T22:59:07+5:30
एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी दोन जणांना अटक

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 24 - एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी दोन जणांना अटक केली. पवन रामटेके आणि विजय सावंग अशी आरोपींची नावे आहेत.
जडी-बुटीचा व्यवसाय करणारे आंध्र प्रदेशातील एक कुटुंब डाबकी रोड पोलीस स्टेशन परिसरात वास्तव्यास आहे. या कुटुंबातील एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जात असताना पवन रामटेके आणि विजय सावंग या दोघांनी तिला थांबवून तिला आमिष दाखविले. आमिषाला बळी पडलेली पीडीतेला त्यांनी एका घरात नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर मुलगी घरी परतली. तिचे आई -वडील जडी बुटीचा व्यवसाय करुन घरी परतल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना त्यांना सांगितली. या घटनेने हादरलेल्या पीडीतेच्या आई -वडीलांनी मुलीसह रात्री उशिरा डाबकी रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून पवन रामटेके आणि विजय सावंग या अटक करुन त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (ड) आणि पॉस्को कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.