अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपींना पोलीस कोठडी

By Admin | Updated: February 2, 2016 02:09 IST2016-02-02T02:09:06+5:302016-02-02T02:09:06+5:30

अमडापूर येथील घटना.

Minor girl escaped; Police detained to the accused | अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपींना पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपींना पोलीस कोठडी

अमडापूर (जि. बुलडाणा): येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, या तील मुख्य आरोपी अर्जुन देवकर यास न्यायालयाने ३ फे ब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर अन्य चार आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.
स्थानिक वडरवाडा भागातील एका अल्पवयीन मुलीला २८ जानेवारी रोजी फूस लावून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार अमडापूर पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी अरुण संतोष गायकवाड, लक्ष्मण हिरामन देवकर, किरण नामदेव कुसळकर यांना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३६६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले होते. यातील मुख्य आरोपी मुलीला घेऊन पुणे येथे गेल्याची माहिती मिळाल्यावरून ठाणेदार मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मिरगे, प्रसाद जोशी, नागवे यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपी अर्जुन देवकर याच्यासह त्या मुलीला ताब्यात घेतले. मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देऊन आरोपीला १ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने मुख्य आरोपी अर्जुन देवकर यास ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Web Title: Minor girl escaped; Police detained to the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.