अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस अटक
By Admin | Updated: October 17, 2016 02:36 IST2016-10-17T02:36:28+5:302016-10-17T02:36:28+5:30
बाळापूर तालुक्यातील घटना; दोन दिवसांची पोलीस कोठडी.
_ns.jpg)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस अटक
बाळापूर, दि. १६- बाळापूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्या धनेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर २१ वर्षीय युवकाने बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला अटक केली .
धनेगाव येथील १७ वर्षीय मुलगी घरात झोपलेली असताना शनिवारी सांगवी जोमदेव येथील वैभव संजय सुरवाडे याने रात्री १२ वाजताच्या सुमारास घरात प्रवेश केला. यावेळी त्याने तिला आत्महत्येची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडीतेच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी वैभव सुरवाडेविरुद्ध भादंवि ३७६,(२) एन ३५४ (अ) ४५७, ४४८ नुसार व आर डब्ल्यू ३, ४, ८ (पॉस्को) अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलीसांनी आरोपीला अटक केल्यानंतर रविवारी अकोला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे करीत आहेत.