अल्पवयीन मुलगा व मुलगी बेपत्ता
By Admin | Updated: November 12, 2014 01:06 IST2014-11-12T01:06:10+5:302014-11-12T01:06:10+5:30
वाशिम येथील अल्पवयीन मुलगा व मुलगी हे अकोला शहरातून सोमवारपासून बेपत्ता.

अल्पवयीन मुलगा व मुलगी बेपत्ता
अकोला : वाशिम येथील अल्पवयीन मुलगा व मुलगी हे अकोला शहरातून सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या पालकांनी सिव्हिल लाईन ठाण्यात मंगळवारी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची नोंद घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम येथील उत्तम नामदेव गायकवाड यांचा मुलगा स्वप्निल (१७) आणि वाशिम येथीलच अन्य १७ वर्षीय मुलगी अकोला येथे शिक्षण घेत आहेत. दरम्यान, स्वप्निल १0 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे उत्तम गायकवाड यांनी मंगळवारी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अकोल्यात शिकायला असलेली वाशिम येथील १७ वर्षीय मुलगीसुद्धा १0 नोव्हेंबरपासूनच बेपत्ता असल्याची माहिती आहे. पोलिसांनी ही मुलगी बेपत्ता असल्याची नोंद करून शोध सुरू केला आहे.