मिनी मंत्रालयांत निवडणुकीची धामधूम

By Admin | Updated: September 18, 2014 01:06 IST2014-09-18T01:06:52+5:302014-09-18T01:06:52+5:30

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष निश्‍चीत : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदासाठी चढाओढ.

Mini ministries hold elections | मिनी मंत्रालयांत निवडणुकीची धामधूम

मिनी मंत्रालयांत निवडणुकीची धामधूम

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरू झाली असुन या निवडणुकीची धामधुम जागा वाटपामध्ये अडकली असतानाच आता मिनी मंत्रालयातील निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणुक येत्या २१ तारखेला होणार असुन त्यासाठी काँग्रेसच्या गोटाता शांतता आहे मात्र राष्ट्रवादीतच चढाओढ सुरू झाली आहे.
बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे अनुसुचित जाती या संवर्गासाठी राखीव असून जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचा अध्यक्ष होणे जवळपास निश्‍चित आहे. काँग्रेसकडे अलका चित्रांगण खंडारे या एकमेव जि.प.सदस्या या प्रवर्गातील असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड होण्याच्या घोषणाच बाकी आहे. दरम्यान काँग्रेसमधील सर्वच नेते सध्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी लॉबींग करण्यात व्यस्त असल्याने या निवडणुकीबाबत ते निश्‍चीत आहेत.
विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीतील दावेदारांची नावे बदलण्याची शक्यता अधिक आहे.

* उपाध्यक्षपदासाठी सिंदखेडराजामधून दावेदारी
सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात १0 जि.प.सदस्य संख्या असून, यात राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाराकाँ ३, अपक्ष, सेना आणि मनसे असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसच्या सौ.माया चव्हाण ह्या एकमेव महिला सभापती आहेत. येत्या २१ सप्टेंबरला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. चा

Web Title: Mini ministries hold elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.