बाजरीची आवक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:53+5:302021-03-26T04:18:53+5:30
अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीची आवक सुरू आहे. गुरुवारी बाजरीला सरासरी १३५० रुपये क्विंटल भाव मिळत असून ...

बाजरीची आवक सुरू
अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीची आवक सुरू आहे. गुरुवारी बाजरीला सरासरी १३५० रुपये क्विंटल भाव मिळत असून ३ ते ४ क्विंटलची आवक होत आहे. तसेच मक्याची आवक सुरू आहे. मक्याला १००० ते १२०० रुपये भाव मिळत आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.
---------------------------------------------------------
बटाटा ७०० ते १००० रुपये क्विंटल
अकोला : बाजार समितीत कांदा, बटाट्याची आवक सुरू आहे. बटाट्याला ७०० ते १००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तसेच कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत. ओला कांदा बाजारात येत असून सद्य:स्थितीत कांद्याला १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. लवकरच कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. परिणामी आवकही वाढणार आहे.
--------------------------------------------------------
कैऱ्यांची मागणी वाढली
अकोला : ऊन तापत असल्याने कैऱ्यांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने सध्या दर चांगलेच वधारलेले आहेत. सध्या बाजारात व्यापाऱ्यांकडे कैऱ्यांची आवक सुरू आहे. एप्रिल महिन्यात मागणी वाढणार असून दरही कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.