शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पोषण आहारात मिळणार दूध भुकटी; प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:22 IST

अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबतच दूध भुकटी दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकिट दिले जाईल.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर तीन महिने हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा निर्णय शासनाने २३ आॅगस्ट रोजी घेतला आहे.शालेय पोषण आहार योजनेमध्ये दूध, दूध भुकटीचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दूध भुकटी (स्किम मिल्क पावडर) दिली जाईल.

अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबतच दूध भुकटी दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकिट दिले जाईल. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा निर्णय शासनाने २३ आॅगस्ट रोजी घेतला आहे.शालेय पोषण आहार योजनेमध्ये दूध, दूध भुकटीचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार गुरुवारी त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शालेय पोषण आहारास पूरक योजना म्हणून दूध भुकटी वाटप योजना राबवण्यात येत आहे.इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दूध भुकटी (स्किम मिल्क पावडर) दिली जाईल. विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या कालावधीसाठी २०० ग्रॅम दूध भुकटीचे पाकिट असे तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची पाकिटे विद्यार्थ्यांना घरी देण्यात येतील. त्या दूध भुकटीपासून पालकांनी घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. त्या दूध भुकटीचे एकाच दिवशी वाटप करण्यासाठी वाटप दिवस जाहीर करावा, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थिती राहील. यावेळी दूध तयार करण्याच्या पद्धतीबद्दल पालकांना मार्गदर्शन केले जाईल. राज्यात उत्पादित झालेल्या दूध भुकटीच्या योजनेतून पुरवठा केला जाणार आहे.- दूध उत्पादक, प्रकल्पांसाठी निर्णयदूध भुकटी व दुधाची निर्यात करणाऱ्या सहकारी, खासगी संस्थांना अनुक्रमे ५० रुपये प्रति किलो, ५ रुपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याच्या प्रस्तावावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. त्या प्रस्तावाला १९ जुलै रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार अनुदान देय असलेल्या राज्यातील संस्थांकडून शालेय पोषण आहारांतर्गत दूध भुकटी खरेदी करून वाटप करण्याला मंजुरी देण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाmilkदूधStudentविद्यार्थीSchoolशाळा