चिमुकलीला सोडून विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन

By Admin | Updated: July 6, 2015 01:27 IST2015-07-06T01:27:42+5:302015-07-06T01:27:42+5:30

अकोला येथील घटना; कोतवाली पोलीसात तक्रार दाखल.

Migration with a lover of marriage without leaving Chinukli | चिमुकलीला सोडून विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन

चिमुकलीला सोडून विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन

अकोला: चिमुकल्या मुलीला व पतीला सोडून ३0 वर्षीय विवाहितेने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी को तवाली पोलिसांनी विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.
शहरातील मध्यवस्तीत राहणार्‍या एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील युवतीने दहा वर्षांंपूर्वी एका युवकासोबत पळून जाऊन विवाह केला. कुटुंबीयांच्या प्रचंड विरोधानंतरही या दोघांनी विवाह केला. परंतु, वातावरण निवळल्यानंतर दोघेही पती-पत्नी अकोल्यात आले आणि गुण्यागोविंदाने संसार करू लागले. युवतीच्या कुटुंबीयांचा तोपर्यंत विरोध मावळून गेला. आठ ते दहा वर्ष सुरळीत संसार केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. मुलगी दोन वर्षांची झाली. दरम्यान, एका इलेक्ट्रिशीयन युवकाचे त्यांच्याकडे कामानिमित्त येणे-जाणे सुरू झाले. युवकाची विवाहितेसोबत ओळख वाढली. जवळीक वाढत गेली. लपूनछपून बाहेर जाणे सुरू झाले. विवाहितेने आपण एका मुलीची आई आहोत.
याची कोणतीही जाणीव न ठेवता, र्मयादा ओलांडली आणि रविवारी विवाहितेने चिमुकल्या मुलीला वार्‍यावर सोडून त्या इलेक्ट्रिशीयन युवकासोबत पळून गेली. घरात कोणालाही माहिती नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले. परंतु तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर विवाहितेच्या पतीने रविवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
कोतवाली पोलिसांनी विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी या प्रकरणी इलेक्ट्रिशीयन युवकाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याचा ठावठिकाणा विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही काहीच माहिती समोर आली नाही.

Web Title: Migration with a lover of marriage without leaving Chinukli