एमआयडीसीत दालमिलला आग
By Admin | Updated: September 14, 2016 02:11 IST2016-09-14T02:11:01+5:302016-09-14T02:11:01+5:30
औद्योगिक वसाहत क्रमांक ३ मधील दालमिलला आग; एक लाख रुपयांचे साहित्य जळून खाक.

एमआयडीसीत दालमिलला आग
अकोला, दि. १३ : औद्योगिक वसाहत क्रमांक ३ मधील एका दालमिलला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाची दोन वाहने घटनास्थळावर पाठविण्यात आली. आगीत एक लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. शहरातील रहिवासी मनोज सुंदरलाल शर्मा यांच्या औद्योगिक वसाहतमध्ये ओमप्रकाश शिवप्रकाश नामक दालमिल असून, या दालमिलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दालमिलमधील साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या आगीची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन वाहनांद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशमन विभाग कार्यरत होता.