शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अन् गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता घरी पोहोचवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:24 IST

रात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांच्या वाहनाने सदर युवतीला मनारखेड येथे पोहोचवले.

अकोला : अंदाजे २१ वर्षांची एक युवती मलकापूर परिसरात रात्री ११ वाजताच्या सुमारास फिरत असताना काही दारुड्या युवकांनी तिचा पाठलाग सुरू केल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर येताच या कार्यकर्त्याने सजगता दर्शवित पोलिसांची मदत घेतली अन् या गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता तिच्या घरी सुखरूप सोडता आले.अकोल्यातील मलकापूर परिसरात शनिवारी रात्री घडलेला हा प्रसंग. एक २१ वर्षांची युवती विमनस्क स्थितीत भटकत होती. याच युवतीच्या मागावार एक मद्यधुंद इसम असल्याची बाब याच परिसरातील युवकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांना कळविले. गवई यांनी सजगता दर्शवित खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांना मोबाइलवरून माहिती दिली. अन् पोलीस त्याच तत्परतेने मलकापुरात पोहोचले. त्यांनी युवतीची विचारपूस केली असता तिने केवळ तिचे नाव सांगितले व गावाचे नावही सांगितले; मात्र इतर कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हती. या दरम्यान सदर युवती गतिमंद असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात नेले. या दरम्यान पोलिसांनी आपले चक्र फिरविले असता ती युवती बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ गावात संपर्क करून खात्री केली. आई-वडिलांच्या मायेला पोरकी झालेल्या युवतीचा सांभाळ तिचे वयोवृद्ध आजोबा करतात. तिला एक बहीण असून, तिचा विवाह झाला आहे, ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांच्या वाहनाने सदर युवतीला मनारखेड येथे पोहोचवले. या सर्व प्रकरात पोलीस कर्मचारी गणेश उज्जैनकर, यशोदाबाई पैठणकर, मोइन खान, गजानन मानकर अमित दारोकार, सागर कनोजिया, सिद्धार्थ सिरसाट, मनीष कनोजिया, हरीश उपाध्याय व मनीष चौधरी अंकुश गवळी यांची सजगता कामात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिकPoliceपोलिस