शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
4
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
5
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
6
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
7
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
8
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
9
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
10
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
11
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
12
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
13
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
14
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
15
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
17
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
18
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
19
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
20
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

बार्शीटाकळी नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी मेहफुज खान रसुल खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:11 IST

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व मिळवित नगराध्यक्ष पदासह सहा नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्या आहेत.

ठळक मुद्देबार्शीटाकळी नगर पंचायतचे पहिले नगराध्यक्ष म्हणून महेफुज खान रसुल खान हे विजयी झाले आहेत. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बमसं यांनी प्रत्येकी सहा जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही.

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व मिळवित नगराध्यक्ष पदासह सहा नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्या आहेत. बार्शीटाकळी नगर पंचायतचे पहिले नगराध्यक्ष म्हणून महेफुज खान रसुल खान हे विजयी झाले आहेत. १५ जुलै रोजी झालेल्या मतदानाचा २० जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बमसं यांनी प्रत्येकी सहा जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला. नगराध्यक्ष पदासाठी पाच, तर नगरसेवक पदासाठी ६७ उमेदवार रिंगणात होते.बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. या मतदानाचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महेफुज खान रसुल खान यांनी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार इमोद्दीन अलीमोद्दीन यांचा १ हजार ६२२ मतांनी पराभव केला. महेफुज खान यांना ४ हजार ९८६ तर नईमोद्दीन अलीमोद्दीन यांना ३ हजार ६६४ मते मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या भाजपच्या संजय बाबुलाल इरचे यांना १ हजार ७२४, शिवसेनेचे गजानन यशवंतराव आखाडे यांना १ हजार १८३ मते आणि अपक्ष उमेदवार अलमगीर खान ७१३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बमसंचे बरोबरी साधली आहे. काँग्रेसचे सहा उमेदवार विविध वॉर्डातून विजयी झाले आहेत. तसेच भारिप-बसमंच्याही सहा उमेदवारांना विजय मिळाला आहे. भाजपाला दोन, तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेला या निवडणुकीत भोपळही फोडता आला नाही. (तालुका प्रतिनिधी)पक्षनिहाय जागाकाँग्रेस-                ०६भारिप-बमसं-       ०६भाजप-                 ०२अपक्ष-                 ०३

 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीElectionनिवडणूकcongressकाँग्रेस