सदस्यांच्या सूचनांचा समावेशच नाही शिक्षण समितीची सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST2021-03-25T04:19:06+5:302021-03-25T04:19:06+5:30

अकाेला जिल्हा परिषदेच्या शाळांची दूरूस्ती प्रस्ताव व सायकल लाभार्थी याेजनेबाबत सदस्यांनी सुचविलेल्या सुचनांचा समावेश न करण्यात आल्याने बुधवारची सभा ...

Meetings of the Education Committee are not included | सदस्यांच्या सूचनांचा समावेशच नाही शिक्षण समितीची सभा तहकूब

सदस्यांच्या सूचनांचा समावेशच नाही शिक्षण समितीची सभा तहकूब

अकाेला जिल्हा परिषदेच्या शाळांची दूरूस्ती प्रस्ताव व सायकल लाभार्थी याेजनेबाबत सदस्यांनी सुचविलेल्या सुचनांचा समावेश न करण्यात आल्याने बुधवारची सभा वादळी ठरली सदस्यांनी आक्षेप घेतल्यामुळे िजल्हा परिषद शिक्षण समितीची सभा बुधवारी तहकूब करण्यात अआली असून आता ही सभा गुरुवारी घेतली जाणार आहे

सभेला जि.प.अध्यक्षा प्रतिभा भाेजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला

सदस्या वर्षा वजिरे, प्रगती दांदळे, शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी डि.के. तायडे अादी उपस्थित हाेते.

जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त असलेल्या शाळा बांधकाम व दुरुस्तीसाठी िज.प.ला. निधी उपलब्ध झाला. मात्र ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याचे अाव्हान प्रशासनापुढे असल्याने बुधवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत शाळा बांधकाम व दुरुस्तीच्या मुद्दावर चर्चा झाली. यादी पाहिल्यानंतर काही सदस्यांनी सुचवलेल्या शाळा नसल्याचे समाेर अाले. काही वेळाने सभाच तहकूब करुन २५ मार्च राेजी दुपारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Meetings of the Education Committee are not included