महापालिकेत आज स्थायी समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:34 IST2020-12-15T04:34:32+5:302020-12-15T04:34:32+5:30

स्थायी समितीच्या सभागृहात सभा आयाेजित करण्यात आली असून यावेळी २५ लाख रुपये किमतीतून केल्या जाणाऱ्या विविध निविदेवर मंजुरी दिली ...

Meeting of Standing Committee in Municipal Corporation today | महापालिकेत आज स्थायी समितीची सभा

महापालिकेत आज स्थायी समितीची सभा

स्थायी समितीच्या सभागृहात सभा आयाेजित करण्यात आली असून यावेळी २५ लाख रुपये किमतीतून केल्या जाणाऱ्या विविध निविदेवर मंजुरी दिली जाणार आहे. सभेत शिवणी येथे १० लक्ष लिटर जलकुंभाची उभारणी करून जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या विषयाला मंजुरी दिली जाईल. महापालिकेच्या विविध विभागातील जुने विद्युत साहित्य काढून घेत नवीन विद्युत साहित्य लावण्यावरही चर्चा केली जाणार आहे. हा विषय यापूर्वी स्थायी समितीमध्ये चर्चेला आला असता ताे स्थगित ठेवण्यात आला हाेता. दरम्यान, स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपकडून चर्चा न करता विषय मंजूर केले जात असल्याचा आराेप सेनेकडून केला जाताे. यासंदर्भात सेनेकडून नगर विकास विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने सभेचा अहवाल मागवला असून त्यासंदर्भात कारवाईचे संकेत दिले आहेत.

Web Title: Meeting of Standing Committee in Municipal Corporation today