खदानींचे मोजमाप, उत्खननाची होणार तपासणी

By Admin | Updated: July 14, 2014 01:22 IST2014-07-14T00:20:03+5:302014-07-14T01:22:53+5:30

अकोला: जिल्ह्यातील खदानींचे मोजमाप आणि त्यामधील गौण खनिज उत्खननाची तपासणी करून, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश

Measurement of foodgrains, excavation will be checked | खदानींचे मोजमाप, उत्खननाची होणार तपासणी

खदानींचे मोजमाप, उत्खननाची होणार तपासणी

अकोला: जिल्ह्यातील खदानींचे मोजमाप आणि त्यामधील गौण खनिज उत्खननाची तपासणी करून, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी भूमिअभिलेख व बांधकाम विभागासह उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिला आहे.
सोलापूर जिल्हाधिकार्‍यांविरुद्ध बाबूराव जाधवार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने गेल्या २ मे रोजी आदेश पारित केला. त्यानुसार गौण खनिजाच्या अवैध उत्खननाबाबत करावयाच्या विविध कारवाईसंदर्भात आणि त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अनुपाल अहवाल येत्या ३0 ऑगस्टपूर्वी शपथपत्राद्वारे सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खनिपट्टाधारकांनी केलेल्या गौणखनिजाच्या उत्खननाचे मोजमाप व तपासणी तसेच गौण खनिजाच्या विनापरवानगी उत्खननाचे मोजमाप व तपासणी पूर्ण करून, खनिपट्टा करारनाम्याची मुदत संपल्यानंतर गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची प्रकरणे, विनापरवानगी उत्खनन व खनिपट्टा करारनाम्यातील अटी आणि शर्तीच्या उल्लंघनाची प्रकरणे यासंदर्भात छाननी व तपासणी करुन, दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याची कारवाई ३१ जुलैपर्यंंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्राव्दारे देण्यात आले आहेत. गौण खनिजाच्या अवैध उत्खननासंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल शपथपत्राद्वारे न्यायालयात सादर करावयाचा असल्याने केलेल्या कारवाईची माहिती १४ ऑगस्टपर्यंंत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खनिपट्टाधारकांच्या खदानींचे मोजमाप आणि त्यामधील गौण खानिजाच्या उत्खननाची तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहे.

 

Web Title: Measurement of foodgrains, excavation will be checked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.