सायकल दुरुस्ती करणा-याचा मुलगा झाला एमबीबीएस
By Admin | Updated: March 1, 2017 22:25 IST2017-03-01T22:25:35+5:302017-03-01T22:25:35+5:30
अकोला जिल्हयातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथील सायकल दुरुस्ती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे शेख मन्नान यांचा मुलगा शेख इरफान हा नागपूर

सायकल दुरुस्ती करणा-याचा मुलगा झाला एमबीबीएस
>ऑनलाइन लोकमत
खेट्री, दि. 01 - अकोला जिल्हयातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथील सायकल दुरुस्ती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे शेख मन्नान यांचा मुलगा शेख इरफान हा नागपूर येथे शिक्षण घेऊन एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झाला.
शेख मन्नान हे गल्या २० वर्षांपासून सायकल दुरुस्तीचे काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते; परंतु अचानक झालेल्या अपघातात ते दिव्यांग झाले. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मुलगा शेख इरफान याने शिक्षण न सोडता जिद्दीने पुढे शिक्षण सुरू ठेवले. अखेर तो एमबीबीएसच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. या यशासाठी मंगळवारी शेख इरफानचा सत्कार त्याच्या नातेवाईकांसह कुटुंबीयांनी केला. ग्रामीण भागातील व विशेषत: सायकल दुरुस्ती करणाºया पित्याच्या मुलाने एमबीबीएस होणे हे गावासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.