महापौरांची खरडपट्टी; पक्षाने मागितला खुलासा

By Admin | Updated: April 10, 2015 02:10 IST2015-04-10T02:10:19+5:302015-04-10T02:10:19+5:30

मुंबईत बैठक; भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी स्थायी समिती सदस्य निवडीची विशेष सभा स्थगितप्रकरण.

Mayor's rebuttal; Disclose the request of the party | महापौरांची खरडपट्टी; पक्षाने मागितला खुलासा

महापौरांची खरडपट्टी; पक्षाने मागितला खुलासा

अकोला: पक्षाने आदेश दिल्यावरदेखील स्थायी समिती सदस्य निवडीची विशेष सभा स्थगित करणार्‍या महापौर उज्ज्वला देशमुख यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत पक्षाने महापौर व गटनेता हरीश आलीमचंदानी यांना सात दिवसांत खुलासा सादर करण्याचा आदेश दिला. मनपातील एकाधिकारशाही संपुष्टात येण्याच्या भीतीमुळे व पक्षांतर्गत राजकारणामुळे स्थायी समितीचे गठण करण्यास जाणीवपूर्वक विलंब करण्याचे धोरण काही पदाधिकार्‍यांनी स्वीकारले; परंतु या प्रकारामुळे शहराचा विकास रखडल्याची ओरड पक्षश्रेष्ठींपर्यंंत पोहोचल्याने अखेर नाईलाजाने महापौर उज्ज्वला देशमुख यांना विशेष सभा काढावी लागली. त्यापूर्वी ६ एप्रिल रोजी भाजप कार्यालयात संघटन मंत्री रामदास आंबटकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष तथा मनपाचे समन्वयक डॉ.अशोक ओळंबे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत स्थायी समितीसाठी गीतांजली शेगोकार, प्रतिभा अवचार, बाळ टाले व सतीश ढगे यांची नावे निश्‍चित करण्यात आली. ७ एप्रिल रोजी पार पडलेल्या सभेत भारिप-बमसंने सदस्य निवडीचा कोटा स्पष्ट करण्याची मागणी लावून धरली. यादरम्यान, प्रदेशाध्यक्षांनी स्थायी समितीसाठी आशिष पवित्रकार व सुरेश अंधारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा आदेश महापौरांना दिला होता. पक्षाने सुचविलेली नावे वाचून काढणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराची प्रदेश स्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली असून महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, युवराज देशमुख यांना मुंबईत हजर होण्याचे निर्देश दिले. गुरुवारी सभा स्थगित केली कशी याबाबत महापौरांसह गटनेता आलीमचंदानी यांना सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचा आदेश दिला.

Web Title: Mayor's rebuttal; Disclose the request of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.