शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महापौरांनी घेतला आढावा; अकोलेकरांना सुधारणांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:24 IST

अकोलेकरांना देण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र असताना अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षाने महापौर पदाची धुरा अर्चना मसने यांच्याकडे सोपविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नवनिर्वाचित महापौर अर्चना मसने यांनी मंगळवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ आढावा घेतला. सुमारे सात तास चाललेल्या आढावा बैठकीतून अकोलेकरांच्या पदरात किमान मूलभूत सुविधा पडतील का आणि यासंदर्भात ठोस अंमलबजावणी कधी होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित करण्यात आला आहे.तत्कालीन महापौर विजय अग्रवाल यांची प्रशासकीय कामकाजावर चांगलीच पकड होती. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत विविध विकास कामांच्या मुद्यावर विजय अग्रवाल यांची तासन्तास चर्चा होत असली तरी सर्वसामान्य अकोलेकरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या अद्यापही ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.अकोलेकरांना देण्यात आलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरल्याचे चित्र असताना अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्षाने महापौर पदाची धुरा अर्चना मसने यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सात तासांच्या मंथनातून सर्वसामान्यांना कितपत दिलासा मिळेल, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.बैठकीला आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती विनोद मापारी, सभागृहनेता गीतांजली शेगोकार, माजी महापौर विजय अग्रवाल, झोन सभापती शारदा ढोरे, उपायुक्त वैभव आवारे, शहर अभियंता सुरेश हुंगे, मुख्य लेखाधिकारी मनजित गोरेगावकर, सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे, प्रणाली घोंगे, नगर सचिव अनिल बिडवे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दिलीप जाधव, प्रभारी कार्यकारी अभियंता (यांत्रिकी सहायक) अजय गुजर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  सूचना केल्या; अंमलबजावणी कधी?शहरात पाइपलाइनच्या कामांचा खेळखंडोबा झाला आहे. नळधारकांना वाढीव देयके दिली जात आहेत. ४०० रुपयांत नळ कनेक्शनबद्दल संभ्रम आहे. हातपंप नादुरुस्त आहेत. अतिक्रमकांनी मुख्य रस्ते गिळंकृत केले आहेत. पार्किंगची निविदा खोळंबली आहे. अवैध होर्डिंगमुळे शहर सौंदर्यीकरणाची वाट लागली आहे. एलईडी पथदिवे, मोकाट जनावरे-डुकरांची समस्या कायम आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर मसने यांनी दिले असले तरी त्यावर प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका