मॅट्रिड इलेव्हन अजिंक्य

By Admin | Updated: September 30, 2015 00:45 IST2015-09-30T00:45:29+5:302015-09-30T00:45:29+5:30

एपीजे अब्दुल कलाम स्मृती फुटबॉल स्पर्धेत मेट्रिड इलेव्हन संघाने न्यू स्टार स्पोर्ट्स क्लब संघास ३-४ गोलने दिली मात.

Matilda XI Adventure | मॅट्रिड इलेव्हन अजिंक्य

मॅट्रिड इलेव्हन अजिंक्य

अकोला: एसीसी मैदान येथे एकदिवसीय एपीजे अब्दुल कलाम स्मृती फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील अंतिम सामना न्यू स्टार स्पोर्ट्स क्लब व मॅट्रिड इलेव्हन संघात झाला. यामध्ये ३-४ गोलने मॅट्रिड इलेव्हन संघाने सामना जिंकून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत शेख आमीर, न्यू स्टारचा अरबाज, विदर्भ क्लबचा गोलरक्षक अवेज खान यांना बेस्ट प्लेअरचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात विदर्भ क्लबचा पराभव करू न मॅट्रिड इलेव्हन तर दुसर्‍या सामन्यात बीएससी क्लबला पराभूत करू न न्यू स्टार क्लबने अंतिम सामन्याकरिता पात्रता सिद्ध केली. रविवार २७ सप्टेबर झालेल्या या स्पर्धेत पंच म्हणून अंजार अहमद कुरेशी, शेख शाहरू ख, अब्दुल शोएब यांनी काम पाहिले. स्पर्धा निरीक्षक मो. अन्सार होते. स्पर्धेतील विजेता-उपविजेता संघाला प्रमुख अतिथी शेख मोबीन मास्टर, लाल खाँ, चॅम्प इलेव्हनचे राजा आणि वरिष्ठ फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. जिल्हा फुटबॉल संघटनेचे सय्यद जावेद अली, अँड. मो.आदिल यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन फिटनेस कोच मो. अन्सार यांनी केले. आभार यंग ब्लड फुटबॉल क्लबचे कोच अंजार अहमद कुरेशी यांनी मानले.

Web Title: Matilda XI Adventure