बुद्ध पौर्णिमेला झाली प्रगणना; १७ बिबट, ३४ अस्वलांचा समावेश

By Admin | Updated: May 15, 2014 20:40 IST2014-05-15T20:40:03+5:302014-05-15T20:40:24+5:30

काटेपूर्णा व ज्ञानगंगा अभयारण्यात १७७० प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

Mathematics of Buddha Purnima; 17 leopard, 34 bears include | बुद्ध पौर्णिमेला झाली प्रगणना; १७ बिबट, ३४ अस्वलांचा समावेश

बुद्ध पौर्णिमेला झाली प्रगणना; १७ बिबट, ३४ अस्वलांचा समावेश

अकोला : बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत काटेपूर्णा व ज्ञानगंगा अभयारण्यात १७७० प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये काटेपूर्णा अभयारण्यात १० तर ज्ञानगंगा अभयारण्यात ७ बिबटे निदर्शनास पडले. बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण राज्यातील वनांमध्ये वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. अकोला वन विभागाच्या अख्यत्यारित येत असलेल्या काटेपूर्णा व ज्ञानंगगा अभयारण्यात १४ व १५ मे च्या सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पाणवठ्यांवर प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये वन विभागाचे कर्मचारी, प्रगणक, मानद वन्य जीव सदस्य व नागरिकांचा सहभाग होता. काटेपूर्णा अभयारण्यात असलेल्या १७ पाणवठ्यांवर ६८३ प्राणी निदर्शनास पडले आहेत. यामध्ये ७ बिबट प्रत्यक्ष निदर्शनास पडले तर तीन बिबट्यांचा आवाज ऐकू आला. ज्ञानगंगा अभयारण्यात खामगावमधील १९ पाणवठ्यांवर ६३४ प्राणी निदर्शनास पडले. यामध्ये चार बिबट्यांचा समोवश आहे तर बुलाडाणामधील १७ पाणवठ्यांवर ४५३ प्राणी आढळले. यामध्ये ३ बिबट्यांचा समावेश आहे. या दोन्ही अभयारण्यांमध्ये १७ बिबट, १३ तडस, ११ चिंकारा, ०२ चौसिंगा, ३४ अस्वल, ०८ कोल्हे, ०९ सायाळ, २१ रान मांजर, ३१२ रानडुक्कर, ३७३ नीलगाय, १२४ चितळ, १३५ भेडकी, ०१ घोरपड, २१५ मोर, १८ मुंगूस, ४१२ माकड, ४४ ससे, सांबर २ व तीन रान कुत्र्यांचा समावेश आहे. काटेपूर्णा अभयारण्यात वाघा १, २, ३, चाका १, २, बनाई बेट, वाघडोह, काकडदारा, रिव्हरव्यू पॉइंट, वरखेड पॉइंट, वनदेव, गोलकप, चौफुला १, चौफुला २, पाणकुंदा, असरकुंड, घारीचा आसुडा या पाणवठ्यांवर गणना करण्यात आली.

Web Title: Mathematics of Buddha Purnima; 17 leopard, 34 bears include

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.