मामेभावानेच केली आतेबहिणीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:14 IST2021-07-18T04:14:39+5:302021-07-18T04:14:39+5:30

माधवनगर येथील रहिवासी नेहा नंदलाल यादव (वय २० वर्ष) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी ...

Matebhavaneca Keli Atebahini's brutal murder | मामेभावानेच केली आतेबहिणीची निर्घृण हत्या

मामेभावानेच केली आतेबहिणीची निर्घृण हत्या

माधवनगर येथील रहिवासी नेहा नंदलाल यादव (वय २० वर्ष) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात. शनिवारी सायंकाळी हे दोघेही घरी असताना त्यांच्यात मोबाइलच्या हेडफोनवरून वाद सुरू झाला. या वादात ऋषिकेश उर्फ बॉबीने संतापात येत आतेबहीण नेहाच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या नेहाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला आहे. या हत्याकांडाची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ, खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पंचनामा करून आरोपी ऋषिकेश उर्फ बॉबी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी नेहाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Matebhavaneca Keli Atebahini's brutal murder