अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगले खेळांचे सामने
By Admin | Updated: November 23, 2014 23:48 IST2014-11-23T23:48:46+5:302014-11-23T23:48:46+5:30
अकोला येथे शिवाजी ऑलिम्पियाड-२0१४

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगले खेळांचे सामने
अकोला: अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, बाभूळगाव येथे आजपासून शिवाजी ऑलिम्पियाड-२0१४ क्रीडा स्पर्धेतील सामन्यांना सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या दिवशी सांघिक खेळाचे सामने झाले. खो-खो स्पर्धेत अ गटामध्ये मुलांच्या गटात शिवाजी हायस्कूल शहर शाखा संघाने राजंदाच्या शिवाजी हायस्कूलचा पराभव केला. मुलींच्या गटाने या पराभवाची परतफेड केली. या गटात राजंदा संघाने शहर शाखेवर मात करीत पराभवाचा वचपा काढला. ब गटात मुलांमध्ये डॉ.एम.एच.सिन्हा, पातूर संघाने शिवाजी महाविद्यालय अकोला संघाला पराभूत केले. क गटात अकोला महाविद्यालयाने सिन्हा महाविद्यालयाचा पराभव केला. बास्केटबॉल स्पर्धेत ब गटात शिवाजी महाविद्यालय अकोला संघाला प्रतिस्पर्धी नसल्याने विजयी घोषित करण्यात आले. क गटात शिवाजी महाविद्यालयाने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पराभव केला. मुलींमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजय मिळविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत अ गटात शिवाजी मुख्य शाखा संघाने शिवाजी विद्यालय आकोटचा पराभव केला. मुलींमध्ये देखील शिवाजी मुख्य शाखेने विजय मिळविला. ब गटात शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने आकोट महाविद्यालयाचा पराभव केला. ब व क गटात मुलींमध्ये शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने जेतेपद मिळविले. क गटात शिवाजी महाविद्यालय अकोला संघाने गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा संघाला पराभूत केले. कबड्डी स्पर्धेत अ गट मुलांमध्ये शिवाजी हायस्कूल गोरेगाव विजयी ठरला तर शिवाजी हायस्कूल तेल्हारा संघ उपविजयी ठरला. मुलींमध्ये शिवाजी हायस्कूल तेल्हारा संघ अ गटात विजयी ठरला. ब गटात सिन्हा महाविद्यालय पातूर संघाने शिवाजी महाविद्यालय निंबा संघाचा पराभव केला. क गटात सिन्हा महाविद्यालय पातूर संघाने शिवाजी महाविद्यालय अकोला संघावर मात केली. स्पर्धेतील मैदानी खेळ वैयक्तिक शर्यती उद्या सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे होणार आहेत.