गायीला कत्तलीसाठी नेणा-या मारुती व्हॅनने महिलेस उडविले!
By Admin | Updated: April 22, 2016 02:32 IST2016-04-22T02:32:11+5:302016-04-22T02:32:11+5:30
सिव्हिल लाइन चौकातील घटना, व्हॅनमधील दोघांना नागरिकांनी बदडले!

गायीला कत्तलीसाठी नेणा-या मारुती व्हॅनने महिलेस उडविले!
अकोला: कत्तलीसाठी गायीला नेणार्या मारुती व्हॅनने स्कूटरवरून जाणार्या महिलेला उडविल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन चौकात घडली. महिलेस उडविल्यानंतर मारुती व्हॅनने पळ काढणार्या तीन युवकांपैकी दोघांना पकडण्यात नागरिकांना यश आले. त्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला, मारुती व्हॅन तोडफोड केली आणि त्या युवकांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी व्हॅनची तपासणी केली असता, व्हॅनमध्ये गाय दिसून आली नाही. रात्री उशिरापर्यंत सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या गायीस मारुती व्हॅनमध्ये डांबून तीन युवक भरधाव सिव्हिल लाइन चौकातून जात होते. दरम्यान, मारुती व्हॅनने चौकातून स्कूटरवरून खेताननगरकडे जाणार्या अपूर्वा अमोल डांगे या महिलेस धडक दिली आणि महिलेस १0 ते १५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात अपूर्वा डांगे या किरकोळ जखमी झाल्या. ही घटना पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी मारुती व्हॅन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, युवकांनी व्हॅनचा आणखीन वेग वाढविला. नागरिकांनी हिंमत करून व्हॅनच्या आडवे होऊ ती थांबविली. तीन युवकांपैकी एक युवक पळून जाण्यात यशस्वी झाला, तर व्हॅनमधील दोघांना बाहेर काढून नागरिकांनी बेदम मारहाण केली आणि व्हॅनच्या काचा फोडून तोडफोड केली.