शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मूर्तिजापूरचे हुतात्मा स्मारक पडले अडगळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2022 12:44 PM

Martyr's memorial of Murtijapur : मूर्तिजापूरात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

- संजय उमकलोकमत न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर :  तालुक्याला स्वातंत्र्यपूर्व प्राचीन इतिहास नसला तरी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात या तालुक्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे.  तालुक्यात शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले श्रम खर्ची घातले, तर काहींनी आपले बलिदान दिले.  या हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला येथील हुतात्मा स्तंभ आता काहीसा अडगळीत पडल्याने दुर्लक्षित झाला आहे.           'जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्ये झाले' असे म्हटले जात असले तरी त्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तत्कालीन हुतात्मा स्तंभ उभा आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारताची २५ वर्षे पूर्णत्वास झाल्या निमित्ताने तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथील (छत्रपती शिवाजी महाराज चौक) जयस्तंभ चौकात १५ ऑगस्ट १९७२ ते १४ ऑगस्ट  १९७३ दरम्यान भारत सरकारने हुतात्मा स्तंभ उभारला आहे, या स्तंभावर समोरच्या बाजूला भारताचे संविधान (प्रस्ताविका) कोरली आहे तर दुसऱ्या बाजूला २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. ९ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून देशभर सर्वत्र साजरा केल्या जातो. त्यातही स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आठवडाभर देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु मूर्तिजापूरात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाकडे प्रशासनाचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. हा हुतात्मा स्तंभ अडगळीत पडला असून, त्याच्या भोवती इतर अतिक्रमण असल्याने हा स्तंभ दृष्टीस येत नाही.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रशासनाने साधे पुष्पार्पण करण्याची सहानुभूती दाखवली नाही. भोवताली झालेल्या अतिक्रमणामुळे या हुतात्मा स्तंभाचा जीव गुदमरतोय यातून मला वाचवा अशाच भावना हा स्तंभ व्यक्त करीत असावा. यांनी पत्करले हौतात्म्य 

सोमाणी माणिकलाल भुरामले (माना ), माळी गोविंद केवजी (जामठी), भुयार गणपत सुर्यभान (कुरुम), मानकर विठू गोविंदा (जामठी), नारायणसिंग भिमसिंग (मूर्तिजापूर), देशमुख विनायकराव केशवराव (सिरसो), राऊत नारायण राघोसा (कुरुम), मेहरे बळीराम लक्ष्मण (सिरसो), देशमुख विश्वासराव काशीराव (कुरुम), शामसा सोनासा (कुरुम), दौलत मोतीराम (कुरुम), देशमुख वामन बळीराम (कुरुम), किसनसिंग भिमसिंग (कुरुम), शिवराम रामजी (जामठी), अभिमान धर्माजी (जामठी), नारायण गणपत (जामठी), देशमुख हिम्मतराव जयवंतराव (माना), धोबी बळीराम शिवराम (माना), दिल्या गंफा (माना), आगरकर नेभीनाथ शांतीनाथ (मूर्तिजापूर)

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाMartyrशहीद