मंगळ मोहीम ही भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची नांदी
By Admin | Updated: January 6, 2015 01:31 IST2015-01-06T01:31:08+5:302015-01-06T01:31:08+5:30
संशोधक मुजूमदार यांचे प्रतिपादन.

मंगळ मोहीम ही भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची नांदी
अकोला: भारतीय वैज्ञानिकांनी मंगळावरची मोहीम ही भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची नांदी असून, विद्यार्थ्यांंनी यांत्रिक युगाकडे वळावे, असे आवाहन अंतराळ संशोधन करणार्या इसरो या संस्थेचे माजी सल्लागार तथा संशोधक प्रकाश मुजूमदार यांनी केले. भारत विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी पर्वावर मुजूमदार यांनी विद्यालयाला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनव्दारे इसरो या अंतराळ संस्थेची माहिती दिली. यावेळी गृज राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, संस्थेचे अध्यक्ष निशिकांत पुजारी, सचिव उमाकांत जोशी, उपाध्यक्ष शालीनी अभ्यंकर, कोषाध्यक्ष पिंपरखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश मुजूमदार व डॉ. रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आाला. संचालन शिक्षिका देशमुख यांनी केले तर प्रास्तविक मुख्याध्यापिका मनीषा अभ्यंकर यांनी व आभार प्रदर्शन पिंपरखेडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.