अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून

By Admin | Updated: May 16, 2016 01:29 IST2016-05-16T01:29:27+5:302016-05-16T01:29:27+5:30

अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून झाल्याची घटना दहिहांडा येथे रविवारी उजेडात आली.

Married woman murdered in connection with immoral relations | अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून

अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून

दहीहांडा (जि. अकोला): अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी उजेडात आली. उर्मिला संतोष घुगरे (३१) हे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अब्दुल सलीम अब्दुल सलाम (३१) याला अटक केली.
उर्मिला ही विवाहिता काही दिवसांपासून दहिहांडा येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. ती शनिवारी रात्री घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही. त्यामुळे तिचा कुटुंबीयांनी शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. रविवारी सकाळी सरस्वती विद्यालयाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी तिच्या नातेवाइकांनी दहिहांडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुल सलीम अब्दुल सलाम (३१) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0२ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला.

श्‍वानपथकाला केले पाचारण
खुनाची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी श्‍वानपथकाला पाचारण केले. श्‍वानाला घटनास्थळासह परिसरात फिरविण्यात आले. श्‍वान आरोपीची घरापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी अब्दुल सलीम अब्दुल सलामला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

रात्रीच झाली होती गायब
विवाहित महिला ही रात्रीच घरातून निघून गेली होती. तिचे अब्दुल सलीम अब्दुल सलामसोबत बर्‍याच वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे तिच्या नातेवाइकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अब्दुल सलीम हा बांधकाम मिस्त्री आहे.

Web Title: Married woman murdered in connection with immoral relations