विवाहितेची आत्महत्या, सासू व पतीची कारागृहात
By Admin | Updated: January 12, 2017 02:17 IST2017-01-12T02:17:58+5:302017-01-12T02:17:58+5:30
न्यायालयाने सासू व पतीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

विवाहितेची आत्महत्या, सासू व पतीची कारागृहात
अकोला, दि. ११- मूलबाळ होत नसल्याने सुनेचा छळ करणारी सासू कुसुम नहाटे, पती संतोष नहाटे यांना सिव्हिल लाइन पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सासू व पतीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. देवका भगवान मुंडे (६५) यांच्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी दुर्गा (३५) हिचे लग्न १३ वर्षांंपूर्वी लहान उमरीतील संतोष नहाटे याच्यासोबत झाले. लग्नानंतर त्यांना मूलबाळ झाले नाही. या कारणावरून त्यांच्या घरात वादविवाद होत असत. मूलबाळ होत नसल्याने दुर्गाची सासू व पती यांच्या रोजच्या छळाला कंटाळून मंगळवारी दुर्गा नहाटे हिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने हातावर थोडक्यात मजकूर लिहून आपल्या आत्महत्येस सासू व पतीला जबाबदार ठरविले. त्यानुसार सासू कुसुम, पती संतोष नहाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.