विवाहितेचा छळ; पतीस अटक

By Admin | Updated: January 20, 2016 01:56 IST2016-01-20T01:56:02+5:302016-01-20T01:56:02+5:30

मोताळा येथील घटना; विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Married to Marriage; Thirty five arrested | विवाहितेचा छळ; पतीस अटक

विवाहितेचा छळ; पतीस अटक

मोताळा : विवाहितेचा छळ करणार्‍या पतीच्या विरोधात विवाहितेच्या तक्रारीवरून १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून पतीस अटक करण्यात आली आहे. रेणुका अनिल चिम (वय ३१) रा. शेलापूर, ह.मु. मोताळा या महिलेने बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, पती अनिल नामदेव चिम रा. शेलापूर याने घरखर्चासाठी माहेरून एक लाख रुपये आण, असा तगादा लावत होता, यासाठी त्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला व शिवीगाळ करीत मारहाण केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी पती अनिल नामदेव चिम रा. शेलापूर याच्या विरोधात कलम ४९८ अ, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास हेकाँ पाटील करीत आहे.

Web Title: Married to Marriage; Thirty five arrested